न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२४) :- मिळकतीच्या कामासाठी फिर्यादीचे पती गणेश दगडु पाटील यांनी आरोपी करुणेश जैन व आकाश जैन यांना कुलमुखत्यारपत्र दिले होते. संगनमताने त्याचा त्यांनी गैरवापर केला. फिर्यादीचे पती यांचे नावे असलेली मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने बनावट दस्त अस्तित्वात आणुन, खोटे आंगठे व सह्या करुन खरेदी खत नोंदवले. फिर्यादीस कोणाताही मोबदला न देता, तो दिला आहे असे दाखवुन त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि ३१/०५/२०२३ ते दि २९/११/२०२३) हवेली क्रमांक ०५, कामीनी हॉटेल समोर, चिंचवड व दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी व पौड यांचे कार्यालय येथे घडला.
याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने १) संजय चंदनमल जैन, २) आकाश संजय जैन, ३) करुणेश संजय जैन, ४) गोरख दौलत धनगर, ५) प्रशांत भिकन गुरव, ६) रामंचद्र आर लांडगे, ७) दादासाहेब पोटभरे, ८) प्रसाद शिंदे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी २१५/२०२४ भादवी कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गोडसे पुढील तपास करीत आहेत.