न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :- प्रभाग क्र 25 वाकड येथील भुजबळ चौक, मधुबन हॉटेल शेजारी रस्त्यालगत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील असलेले अनधिकृत रूफटॉप स्पाइस फॅक्टरी, अब्सोल्यूट बार्बेक्यू व ९ व्या मजल्यावरील पब्लिक हॉटेल येथे शनिवारी ड क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये एकूण अंदाजे 9000 चौ फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत रूप टॉप पाडण्यात आले आहेत.
ही कारवाई आयुक्त यांच्या आदेशानुसार, उपायुक्त लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड ‘ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवानी, उप अभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता, अमोल पडलवार बिट निरीक्षक सुहास भगत, ओंकार ताटे देशमुख, शेषराव अटकुरे कनिष्ठ अभियंता ड क्षेत्रीय अतिक्रमण पथकप्रमुख अमोल शिंदे, एम.एस. एफ जवान- १३ पोलीस उपनिरीक्षक श्री अँथोनी, पोलीस -४, मजूर -30, गॅस कटर -२ मनपा कर्मचारी व मजूर १५ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.











