- मावळ तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) (दि. २६ मे २०२४) :- नायगाव येथील बनताबाई पुताजी काजळे-चोपडे यांनी वयाच्या 58 व्यावर्षी बारावीची परीक्षा दिली आणि चांगले यश देखील मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे बनताबाई यांचे मावळ तालुक्यातून सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
बनताबाई या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. हे काम करत असताना त्यांनी बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना त्यांना आदिती युनियन सेंटर या सेंटरविषयी माहिती मिळाली. त्यांनी या सेंटरच्या माध्यमातून संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत ऑनलाईन क्लासेेस जाँईट करून अभ्यासास सुरूवात केली.
सकाळी अंगणवाडी सेविकेचे काम, दुपारी घरातील, शेतातली कामे अशी जबाबदारी पार पाडत अभ्यास केला. यामध्ये त्यांना त्यांच्या घरातील सदस्यांनी वेळोवेळी चांगले सहकार्य केले. यामुळे तालुक्यातून सर्व स्तरामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापुढे ग्रॅज्युएशन देखील करण्याचा त्यांचा मानस आहे











