न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :-निगडी प्राधिकरण येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचे शटर अर्धवट वाकवुन, अर्धवट उघडे करुन दुकानाच्या आतमध्ये प्रवेश करीत दुकानातील तिजोरी तोडली. २०,००,००० रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ९,००,००० रु किंमतीचे १० किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम १८,००० रुपये आणि दुकानातील सीसीटीव्ही कट करीत १,००० रुपये किंमतीचा डीव्हीआर देखीलचोरुन नेला आहे.
तसेच या दुकानाच्या शेजारी असणारे इतर दुकानाचे सीसीटीव्ही देखील तोडुन त्यांचे देखील नुकसान केले आहे. हा प्रकार (दि २४ ते दि. २५) घडला.
फिर्यादी संदिप छगनराव वुहाडे (वय ५०, धंदा सोने चांदी व्यापारी) यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी २७२/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८०,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि देशमुख तपास करीत आहेत.


















