- सांगवीतील बारामती सहकारी बँकेची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :- दि. बारामती सहकारी लि. बँक, शाखा सांगवी येथील बँकेचे अधिकृत मुल्यांकन कर्ता आरोपी क्र १३ यांच्यावर बँकेची सोने तारण विभागाची महत्त्वाची जबाबदारी असताना आरोपी क्र. ०१ ते आरोपी क. १२ यांच्यासोबत संगणमत करुन त्यांच्याकरवी खोटे सोने बँकेत तारण ठेवुन त्याबाबत खोटे दस्तऐवज तयार केले.
बँकेकडुन एकुण ४१,९९,००० रूपये (एक्केचाळीस लाख नव्यान्नव हजार रुपयाची) सोने तारण कर्ज घेवुन बँकेची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि १४/०३/२०२३ ते दि. २६/०२/२०२४) पर्यंत सुरु होता.
याप्रकरणी विजय बाबुराव कदम (मॅनेजर दि. बारामती सहकारी बँक) यांनी आरोपी १) योगेश शरद जगताप, २) प्रशांत शरद हेगडे, ३) महेश सुदाम धुमाळ, ४) गणेश किसन कोंगाळे, ५) प्रियंका गणेश कोंगाळे, ६) निखील राहुल म्हेत्रे, ७) गणेश शरद बागडे, ८) नम्रता गणेश बागडे. ९) वैष्णवी प्रसाद डहाळे, १०) प्रांजल विजय जोशी, ११) प्रसाद चंद्रकांत डहाळे, १२) विठठल बाबुराव राउत, १३) दिपक विठठल शहाणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २२८/२०२४ भा.द.वि. कलम ४२०,४०६,४०९,४६५,४६८,३४ प्रमाणे सर्गुवांच्न्हाया विरोधात दाखल केला आहे. पोउपनि भालेराव पुढील तपास करीत आहेत.

















