न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे २०२४) :- व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करीत शेअर्स मार्केटमधुन जास्तीचा नफा कसा मिळतो आहे? असे भासवत व दोघांचा विश्वास संपादन केला. त्यांना ट्रेडिंगचे अकाऊंट तयार करावयास लावले. आरोपी सांगतील त्याप्रमाणे शेअर्स खरेदी करावयास लावले. त्यातुन मोठ्या प्रमाणावर परतावा आहे, असे भासवुन फिर्यादीकडून ०१,६७,८०,००० रुपये व फिर्यादीचा भाऊ यांच्याकडुन ७७,५०,००० रुपये शेअर्स मार्केटमध्ये लावण्यास सांगत एकुण २,४५,३०,००० रुपये परत न करता दोघांची आर्थिक फसवुणक केली आहे.
ही घटना (दि ०५/०१/२०२४ ते ०८/०३/२०२४) दरम्यान फिर्यादी याचे राहते घरी चऱ्होली येथे घडली. ५३ वर्षीय फिर्यादीने आरोपी Vanguard DNP Group चे अॅडमीन Alexis gray मो. नंबर ४४७७७८४३४८१७ + ४४७७७११५०९८३, व +अ ४४७७७८४३४८१७ यांच्या विरोधात फिर्याद नोदविली आहे.
दिघी पोलिसांनी २४५/२०२४भादवि कलम ४०६,४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ डी प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि ढमाळ तपास करीत आहेत.

















