न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- बांधकाम प्रकल्पासाठी फिर्यादीसह इतर साक्षीदारांकडून फ्लॅटच्या रक्कमेचा स्विकार केला. त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुदतीत बांधकाम प्रकल्प बांधून सदनिकांचा ताबा दिला नाही. त्यामधील सुखसुविधा दिल्या नाही. आरोपी यांनी फिर्यादी यांची १०,९०,१०५ रूपयाची फसवणुक करून इतर १२४ सदनिका धारकांची ११,२२,०३,५१६ रूपयांची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ११/१०/२०१८ ते आजपर्यंत) अतुल्य रघुकूल, वडमुखवाडी सव्हे नं. १५५/१ येथे घडला. फिर्यादी सिध्देश्वर शंकर सिनलकर (वय ४५ वर्ष, काळजेवाडी, च-होली) यांनी आरोपी अतुल्य रघुकूल वडमुखवाडी सव्हे नं.१५५/१ पिंपरी चिंचवड. चे प्रवर्तक व विकसक कॅलेक्स गृप ऑफ कंपनीज कॅलेक्स लेनोरा रियल्टी एल.एल.पी ऑफिस मिलेनियम स्टार, एक्सटेंशन बिल्डीग रुबीहॉल हॉस्पिटल जवळ, ढोले पाटील रोड पुणे. चे भागिदार १) गौरव सोमानी, २) नितीन जाजु, ३) शाम लढ्ढा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी २५०/२०२४ भादवि कलम-४०६,४०९,४२०,३४, मोफा कायदा कलम-३, ४, १३ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.














