- एकच वेळ निश्चित करा; व्यापारी आघाडीची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- शहरातील किराना, आईस्क्रिम आणि केक शॉपी आदी दुकाने सुरू ठेवण्याची एकच वेळ निश्चित करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या (शिंदे गट) व्यापारी आघाडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड आयुक्तांना नुकतेच देण्यात आले आहे.
शहरातील दुकाने रात्री सुरू असल्यानंतर बऱ्याचदा गस्तीवरील पोलिस ते बंद करायला सांगतात. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, रावेत, आकुर्डी व भोसरी आदी सर्व भागात दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वेगवेगळी आहे का? असा प्रश्न व्यापारांमध्ये निर्माण होत आहे.
तसेच, तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने हॉटेल, केक शॉप आणि आईस्क्रीम आदी किमान अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष कमलेश मुथा यांनी केली आहे. तसेच, वेळेबाबतची नियमावली तत्काळ जाहीर केली तर त्याची अंमलबजावणी शहरातील व्यापारी संघटनांकडून केली जाईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.











