न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- वडीलोपार्जीत शेतजमीन मिळकत विकसनासाठी आरोपी यांना नोंदणीकृत विकसनकरारनामा व कुलमुखत्यारपआद्वारे फिर्यादी यांनी लिहुन दिलेली आहे. संपूर्ण बांधकाम पुर्ण केल्यानंतर ५६ टक्के सदनिका, गाळे यांची विक्री करुन त्याचा मोबदला आरोपी यांनी स्वीकारणे व उर्वरीत ४६ टक्के बांधकाम स्वरुपात येणारा मोबदला फिर्यादी व त्यांच्या कुटूंबीयांना देण्याचे ठरलेले होते.
तसेच मिळकतीच्या विकसनानंतर संपूर्ण बांधकामातील फिर्यादी व त्यांचे कुटूंबीयांना मोबदला म्हणून ४६ टक्के बांधकामाची विक्री करण्याचे अधिकार एजंट म्हणून फिर्यादी यांनी आरोपी यांना विश्वासाने दिलेले होते. आरोपी यांनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांचे कुटूंबीयांचा विश्वासघात करुन त्यांना मिळणा-या बांधकाम स्वरुपातील ४६ टक्के मोबदल्यातील सदनिकांची विक्री फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचे वतीने कुलमुखत्यारपत्रधारक एजंट म्हणुन विविध खरेदी घेणा-यांना केली. त्यापोटी बाजारभावाप्रमाणे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचे हिश्श्यांवर ४६ टक्के बांधकामाचा मिळालेला मोबदला रक्कम रुपये ६,६४,०४,३१२ रुपये स्वीकारले. तसेच आरोपीने महिलेला विक्री केलेल्या सदनिकांची मिळालेली रक्कम फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांच्या तर्फे कुलमुखत्यारधारक एजंट म्हणून स्वीकारुन सदरची रक्कम फिर्यादी व त्यांचे कुटुंबीयांना न देता आरोपी यांनी स्वतःकडे ठेवुन रकमेचा अपहार केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ३०.१२.२०१३ पासून ते आजपर्यंत) जाधववाडी येथील गट नंबर ६६० मधील क्षेत्र ००.३७ आर मिळकतीमध्ये घडला. फिर्यादी हनुमंत निवृत्ती जाधव (वय ५८ वर्षे, व्य. शेती रा. जाधववाडी चिखली) यांनी आरोपी ए.व्ही. कार्पोरेशन तर्फे १) सागर बबनराव मारणे (रा. आकुर्डी), २) संदीप राम पवळे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३१६/२०२४ भादविक ४०६४०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुळीक तपास करीत आहेत.











