न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- मोशी येथील कल्याण कॉलनीमधील जमीन गट नं. ४५८ मधील प्लॉट नं. ८ मध्ये (दि.११/०३/२०२४) रोजी आरोपी नं १ याने आरोपी नं २ यांच्या सांगण्यावरुन अनाधिकृतपणे प्रवेश केला.
जेसीबीने फिर्यादीचे प्लॉटचे दगड, सिमेंटचे कम्पाऊंड पाडले. फिर्यादीचे अंदाजे ४,००,००० रुपयांचे नुकसान केले आहे. फिर्यादी समीर दादामिया पिंजारी (वय ४२ वर्षे) यांनी आरोपी जेसीबी चालक हजारे व सुनिल आरइसरानी (ट्रोजन बिल्डर्स) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २७५/२०२४ भा. दं. सं. कलम ४४७, ४२७, १०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा पारधी पुढील तपास करत आहेत.











