न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- दोघांनी दुकान व गोडावुनमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता फिर्यादीच्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या कंपनीचे बनावट टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट विक्री करीत असताना व विक्री करीता ठेवले. त्यात एकुण १०,३१,४०० रुपये किंमतीच्या मालाचा समावेश आहे.
हा प्रकार (दि ३०/०५/२०२४ दरम्यान १) शिव गारमेंट्स ४/१७, चिराग फर्निचर जवळ, साई चौक पिंपरी, २) संजय ट्रेडलिंक शास्त्रीनगर, साई चौक पिंपरी, ३) रफीक ऑटो गॅरेज शेजारी, आडवाणी धर्म शाळेजवळ, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी महेश विष्णू कांबळे यांनी आरोपी १) संजय चंद्रकांत भोजवानी (वय २९ वर्षे, साई श्रध्दा गार्डन, फेज २, ज्योतीबा मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी), २) संजू दिलीप बसतांनी (वय २४ वर्षे, रा. नवमहाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ५१४/२०२४ कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वपोनि कडलग पुढील तपास करीत आहेत.











