न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२४) :- कपडे धुताना पॅन्टच्या खिशात तीन चिठठया मिळाल्या. त्या वाचुन पाहिल्या असता त्यामध्ये मयताने निघोजे ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक आरोपी क्र १ याने फिर्यादीच्या मयत वडीलांचे दीड लाख रुपयाचे काम केल्याचे पैस दिलेले नाही व ते मागितले असता देणार नाही, आमचे कुटुंब बराबद करीन, वडीलांना ठारे मारेन अशी धमकी दिली, असे लिहिले असून त्याच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. तसेच फिर्यादी यांचा भाउ विकास याचे सासरवाडीत आरोपी क्र २ ते ८ यांनी भावाला व वडीलांना धमकी दिली होती. तमचा मुलगा दिवठाणा येथे आल्यास त्याला जीवे मारू, तुमच्यावर केस करू अशी धमकी दिल्याने त्या त्रासातून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.
आरोपी क्र १ ते ८ यांनी पैशाच्या कारणावरुन फिर्यादीचे वडील रमेश मच्छिंद्र मोहिते (वय ४५ वर्षे) यांची कॉलर पकडून धक्का दिला व सकाळी मुलाला व पोराला मारहाण करू, आमचे कोणीही काही करू शकत नाही, अशी धमकी देऊन गळफास घेवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी यांची आजी हिने फिर्यादी यांचे मयत वडील यांचे कपडे धूत असताना (दि २७) रोजी सकाळी ०६.३० वा. दौडकरवाडी, ता. खेड जि. पुणे येथे हा प्रकार उघडकीस आला.
फिर्यादी आकाश रमेश मोहिते (वय २४ वर्ष) याने आरोपी १) विष्णु लक्ष्मण गाडीलकर (रा शिरूर), २) भास्कर जाधव, ३) विलास भास्कर जाधव, ४) संजय भिमराव जाधव, ५) राजकन्या भास्कर जाधव, ६) अंजली विकास मोहिते (सर्व रा. दिवठाणा, ता. खामगाव, जि. बुलढाणा), ७) स्पेष दौडकर ८) एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ३७०/२०२४ भादवि का क ३०६,३४ प्रमाणे सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सुकाळे तपास करीत आहेत.











