न्यूज पिसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनेनुसार महिला कार्यकारिणीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदी अॅड. उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा संघटकपदी सरिता साने, चिंचवड विधानसभा संघटकपदी अनिता तुतारे, मावळ जिल्हा संघटकपदी शादान चौधरी या महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीस सामोरे जाताना खासदार श्रीरंग बारणे यांना मावळचा गड राखण्याकामी या विश्वासू रणरागिनींची साथ लाभणार असल्याचे स्पष्ट होते.















