न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- काल दिनांक २५ रोजी पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत थकीत मिळकत करासंदर्भात अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला. या सभेमध्ये सर्वानुमते अभय योजनेस मान्यता देण्यात आली
या योजनेंतर्गत माहे ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर करभरणा करणा-या मिळकतधारकास मनपाकर शास्तीच्या एकूण रकमेपैकी ९० टक्के कर सवलत मिळणार आहे.
तर माहे १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर करभरणा करणा-या मिळकतधारकांना महापालिकेतर्फे मनपाकर शास्ती रकमेच्या ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
त्यामुळे या निर्णयाचा शहरातील लाखो अनाधिकृत बांधकाधारकांना फायदा होणार असल्यामुळे त्यांनी या योजनेचे स्वागत केले आहे.
















