- ‘रिश्तों मे नई रोशनी’ हे फॅमिली शिबिर उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- तेज ग्यान फाउंडेशनतर्फे ‘सरश्री‘ यांच्या शिकवणी वरती आधारित रिश्तों मे नई रोशनी या फॅमिली शिबिरचे आयोजन चाकण MIDC उद्योजक संघटनेतर्फे गुरुवारी (दि. २) रोजी चिंचवड येथे केले होते. या शिबिराचा लाभ हा शेकडो उद्योजकांनी स्वतःच्या कुटुंबासमवेत घेतला.
हे फॅमिली शिबिर भारतभर गाजलेले आहे. याला सर्वच क्षेत्रामधून मागणी आहे. मुख्यतः कोणत्याही कुटुंबामध्ये सुसंवाद नसल्यामुळेच सर्व अडचणी तयार होत असतात. हा सुसंवाद नेमका कसा करायचा, घरी सर्वांनी मिळून कोणकोणत्या कार्यपद्धती अवलंबवयाच्या याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे या शिबिरामध्ये देण्यात येते. या शिबिरामध्ये शिबिरार्थी यांना फक्त शिकवण्यात येत नाही तर त्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाकडून कार्यशाळेप्रमाणे प्रॅक्टिकल देखील करण्यात येते म्हणून या शिबिराला खूप चांगला रिझल्ट मिळतो. हे फॅमिली शिबिर हे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालले. या फॅमिली शिबिरामध्ये आलेल्या सर्वच कुटुंबीयांनी मनापासून सहभाग घेतला. शिबिरातून बाहेर पडताना सर्वांच्या चेहऱ्यावरती जे एक हास्य होते तसेच आपल्या जोडीदाराविषयी मुलांविषयी प्रेम निर्माण झाले होते हेच या फॅमिली शिबिराचे फलित होते.
शिबिर आयोजित करण्याची संपूर्ण जबाबदारी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे व संचालक प्रवीण शिंदे यांनी नियोजनबद्ध पार पाडली. यामध्ये त्यांना चाकण MIDC उद्योजक संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे व लक्ष्मण काळे, नंदकुमार सावंत, प्रशांत गोरे, CA ह्रुषीकेश खळदकर आदी उद्योजकांनी मोलाची साथ दिली.
तेज ग्यान फाउंडेशन तर्फे सत्यचार्य स्नेहाली मंदार वायकर, रविंद्र शेंडे, महेश जाधव व आदी तेजसेवक यांनी हे फॅमिली शिबीर खुप सुंदररित्या घेतले. चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी सर्वांचे आभार मानून शिबीराची सांगता केली.











