- पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकी; चिंचवडगावतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- महाराष्ट्र शासनाच्या उदयोग उर्जा व कामगार यांच्या संपादनातुन फिर्यादीचे सासरे यांची सर्वे नं. १५८, चिंचवड येथील जमिनीवरील नोंद कमी करण्याकरीता आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आरोपी क्र १ यांच्या मागणीप्रमाणे त्याची आई आरोपी क्र २ हिचे अकाउंटवर आरटीजीएसद्वारे एकुण रु. २१,२५,००० रुपये रक्कम घेतली.
तसेच आरोपीच्या गुगल पे, फोन पेद्वारे १,३५,८०० रु. तसेच रोख स्वरुपात २,३९,२०० रु. असे वेळोवेळी फिर्यादीचे सासरे सतिश निंबाळकर यांच्या राहत्या घरात फिर्यादीचे सासरे, फिर्यादीचे मामा, प्रतिक गरुड व सतिश आगळे याचा मावस भाऊ रोशन भोसले यांच्या समक्ष फिर्यादीकडुन एकुण २५,००,००० रु घेतले. आरोपी यांनी मंत्रालयातील संबधित विभागात कोणतेही प्रकरण दाखल केले नाही. प्रकरणाकरिता फिर्यादीने विश्वासाने दिलेले २५,००,००० रु स्वताःच्या फायदयासाठी वापरुन व मागणी केल्यानंतरही फिर्यादीचे पैसे देण्यास नकार देवुन व फिर्यादने त्यांचे पैसे परत मिळणे करिता आरोपीकडे तगादा लावला असता आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देवुन फिर्यादीची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.०७/०९/२०२१) ते आजपर्यंत निंबाळकर प्लाझा, पीसीएमसी रोड, पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव येथील फिर्यादी यांचे सासरे यांच्या घरात घडली.
फिर्यादी उमेश पांडुरंग तांबे (वय. ३७, कबड्डी प्रशिक्षक रा. रहाटणी) यांनी आरोपी १) सतिश वसंत आगळे, २) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिंचवड पोलिसांनी २३४/२०२४ भा.दं.वि कलम ४०६,४२०,५०६,३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि झिंजुर्डे तपास करीत आहेत.