न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २० पोलीस अधिकारी व अंमलदार हे (दि. ३१/०५/२०२४) रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय या ठिकाणी करण्यात आले होते.
पिंपरी चिचंवड आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियमित वयोमानाने सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश दत्तात्रय माने, ज्ञानेश्वर बबन काटकर पोलीस निरीक्षक, राजन गोंविंद महाडिक पोलीस उप निरीक्षक, साईनाथ शंकर वरे पोलीस उप निरीक्षक, रावसाहेब भिमराव थोरवे श्रेणी पोलीस उप निरीक्षक, वसंत माणिकराव फडतरे श्रेणी पोलीस उप निरीक्षक, गोरख केरु थेऊरकर श्रेणी पोलीस उप निरीक्षक, किसन निवृत्ती गौडदाब श्रेणी पोलीस उप निरीक्षक, चंद्रकांत सुलाब काटे श्रेणी पोलीस उप निरीक्षक, सुरेश सोमनाथ रासकर श्रेणी पोलीस उप निरीक्षक, लक्ष्मण मुरलीधर नरवडे श्रेणी पोलीस उप निरीक्षक, घेनसिध्द सोमलिंग पुजारी श्रेणी पोलीस उप निरीक्षक, सदाशिव रामचंद्र खांडेकर श्रेणी पोलीस उप निरीक्षक, दिलीप रामचंद्र लोखंडे श्रेणी पोलीस उप निरीक्षक, महादेव निवृत्ती भागवत श्रेणी पोलीस उप निरीक्षक, रामहरी गेनबा तनपुरे श्रेणी पोलीस उप निरीक्षक, दादाभाऊ विष्णु पवार श्रेणी पोलीस उप निरीक्षक, अंकुश गुलाबराव कदम सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, हरिभाऊ दशरथ काळे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, राजेंद्र भगवंतराव दौंडकर पोलीस हवालदार या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा यात समावेश आहे.
या कार्यक्रमात विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पगुछ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, भेटवस्तु देवुन सत्कार केला. तसेच त्यांच्या भावी आयुष्याकरिता व आरोग्याकरिता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे-केदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन लांडगे, पोलीस मुख्यालयातील कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.