न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- चौघांनी फिर्यादीचे मनोरुग्ण वडील व आजी हिच्या नावे असलेली संपुर्ण जमीन कमी पैशात संपुर्ण पैसे न देता संगणमतांनी नियोजनबध्द सुनियोजित कट रचुन फसवणुक करुन बळकविली आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०२० च्या दरम्यान मे. दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी-२ हिंजवडी येथे (दि.०२) रोजी रोजी ०१.०३ वा. घडला.
फिर्यादी प्रथमेश अंकुश रानवडे (वय २१ वर्षे वारजे माळवाडी पुणे) याने आरोपी १) ऋतिक राजेंद्र धनकुडे, २) राजेंद्र ज्ञानोबा धनकुडे, ३) महिला आरोपी, ४) महिला आरोपी (सर्व रा. बाणेर, ता. हवेली जि.पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७०६/२०२४ भा.द.वी कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि महाले तपास करीत आहेत.