न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- राहत्या घराचा दरवाजा उघडा असताना त्या दरम्यान अज्ञात चोरटयाने उघडया दरवाजे वाटे घरात प्रवेश केला. घरातील ७१.४८७ ग्रॅम वजनाचे सोन्या व १०,००० रु किं चे ८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकुण ५,२५,००० रु. किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन नेले आहेत.
हा प्रकार (दि. ०३) रोजी दुपारी ३.३० वा ते ४.३० च्या दरम्यान द्वारका क्वीनस पार्क, पिंपळे सौदागर येथे घडला. याप्रकरणी तनु अग्रवाल (वय ३३ वर्ष) यांनी आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ६८९/२०२४ भा.दं.वि कलम ३८० प्रमाणे अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि नलावडे पुढील तपास करीत आहेत.