न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- एकाने फोन करून पिक कर्जाचे वाटप लवकर केले नाही म्हणुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी हे संध्याकाळी ग्रामपंचायत समोर बसले असता आरोपी १ हा ग्रामपंचायत समोर आला.
फिर्यादी यांनी त्यास विचारले की ‘माझ्या मुलाला विनाकारण त्रास का देतो? त्यावरून फिर्यादी व आरोपी १ यांच्यात बाचाबाची शिवीगाळ झाली. त्यानंतर फिर्यादी हे दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागुन आलेल्या तिघांनी फिर्यादी यांची गाडी ओढयाच्या जवळ थांबवली. ‘तुला खुप माज आला आहे का’ असे म्हणुन दमदाटी व शिवीगाळ केली. हाताच्या बोटांना कसलातरी लोखंडी फायटरसारख्या वस्तुने फिर्यादीच्या डाव्या डोळयाच्या वर ठोसा मारून जखमी केले, असं फिर्यादीत म्हंटले आहे.
हा प्रकार (दि.०३) रोजी सायं ६.३० वा चे सुमारास काळुस गावात, संगमवाडी रोडवर, ता खेड जि पुणे येथे घडली. फिर्यादी बाळासाहेब राघु साळंखे (वय ५७ वर्षे रा काळुस, संगमवाडी रोड ता खेड जि पुणे) यांनी आरोपी १) धोडिबा कुंडलिक पवळे (रा काळुस ता खेड जि पुणे), २) आणखी दोन इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ३८२/२०२४ भादवि कलम ३२४,३४१, ५०४,५०६, ३४ प्रमाणे तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि बोरकर पुढील तपास करीत आहेत.