न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- लाखो कष्टकरी, मालवाहू माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकविणा-या अण्णासाहेबांची ८५ वी जयंती महाराष्ट्रभर उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्यावतीने अण्णासाहेब पाटील यांच्या चिंचवडमधील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अण्णासाहेबांनी कष्टाने, संघर्षाने उभी केलेली कामगार चळवळ कामगारांच्या हितासाठी आणखी सशक्त करणार असून, त्यांनी सुवर्ण अक्षराने निर्माण केलेला हा इतिहास माथाडी कामगारांच्या कायम स्मरणात राहील या करीता प्रयत्न करणार आहे व माथाडी कामगार व समाजातील वंचित घटकांची मोट बांधून समाजउन्नती साधणारा आहे असे इरफान सय्यद म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, मारुती कौदरे, भिवाजी वाटेकर, संदीप मधुरे, नागेश वनवटे, बाळासाहेब शिंदे, विजय खंडागळे, प्रल्हाद खेडकर, आनंद हिंगे, अंकुश सोनसाळे, पांडुरंग काळोखे, शिवाजी घोटेकर, मुरली कदम, खंडू गवळी, किसन बावकर, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, गोरक्ष बांगर, सतीश कंठाळे, शंकर मदने, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे, ज्ञानदेव पाचपुते, सापते, अशोक साळुंके, जोगिंदर शर्मा, ओंकार माने, समर्थ नाईकवाडे, ज्ञानोबा मुजुमले, श्रीकांत मोरे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.