न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : मराठवाडा युवा मंचाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे पुरस्कार येत्या रविवारी पशुसंवर्धन व दग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते प्रदान केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष सत्यजीत चौधरी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी ५ वा. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पो. महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पीएमआरडीएचे सीईओ किरण गित्ते, मुंबईचे पो. उपायुक्त निसार तांबोळी, पो उपायुक्त प्रसाद अक्कानौरू, आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त शांतेश्वर स्वामी, मंत्रालयातीचे महसूल अप्पर सचिव शरद डोके, दिग्दर्शक अजित वाडीकर, लेखक शरद तांदळे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ सीमा मोरे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम दंडिमे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच डॉ. श्याम शिंदे (वैद्यकीय), महेश सावंत (प्रशासकीय), एन एस शिंदे (शैक्षणिक), रमाकांत रोडे (औद्योगिक), मोहन बडुरे (कला -क्रिडा ), बाळासाहेब गायकवाड (युवा गौरव) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमावेळी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि वधू-वर सुचक मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन होणार आहे.