न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १९ जून २०२४) :- देहू नगरपंचायतीच्या बुधवारी (ता. १९) झालेल्या निवडणुकीत मयूर शिवशरण यांची उपनगराध्यक्षपदी; तर पाणी विभागाच्या सभापतीपदी सुधीर काळोखे यांची बिनविरोध निवड झाली.
हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे आदी यावेळी उपस्थित होते.
देहू नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची एकहाती सत्ता असून १७ सदस्य आहेत. रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे, निवडणूक अधिकारी संजय असवले यांनी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. तसेच पाणी पुरवठा विभाग सभापतीपदी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे, काळोखे यांची बिनविरोध निवड झाली.











