न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- पिंपळे सौदागर येथे पाळीव कुत्र्यांचे उद्यान (डॉग पार्क) विकसित केले आहे. त्याला प्राणिप्रेमींचा प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील हे एकमेव उद्यान असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. एक व्यक्ती व एका श्वानाला २० रुपये शुल्क असणार आहे.
नागरिक मोठ्या हौसेने पाळीव कुत्रे व मांजर तसेच पक्षी पाळतात. त्याचा इतका लळा लागतो की, ते कुटुंबातील सदस्य होऊन जातात. अशा पाळीव कुत्र्यांच्या सोईसाठी महापालिकेने डॉग पार्क उभारले आहे. पिंपळे सौदागर येथील स्वराज चौक येथील लिनिअर गार्डनच्या कोपऱ्यात ३२ गुंठे जागेत ते बनविले आहे. पाळीव कुत्र्यांची खेळण्याची व्यवस्था करून मनुष्य व प्राणी संघर्ष कमी करण्याच्या हेतूने ही संकल्पना राबविली आहे.
भांडणे होऊन नयेत म्हणून छोट्या व मोठ्या कुत्र्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे. आक्रमक कुत्र्यांनाही वेगळे ठेवले जाते. कुत्र्याने विष्ठा केल्यानंतर मालकाने ती उचलूम शौचालयात टाकण्याची व्यवस्था केली आहे.
पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक व्यक्ती व एका श्वानाला २० रुपये शुल्क आहे. महिन्याचे शुल्क ५०० रुपये आहे. सेलिब्रेशन पॉईन्टचे शुल्क दोन तासासाठी एक हजार रुपये आहे. शुल्क आकारणी लवकरच लागू करण्यात येणार आहे.
हे पार्क १४ जानेवारीला खुले करण्यात आले आहे. छोटी व मोठी कुत्री असे दोन विभाग करण्यात आले आहेत. हिरवळ निर्माण करून कुत्र्यांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रैक बनविण्यात आला आहे. खेळण्यासाठी हॉग माऊण्ट बनविण्यात आले आहेत. कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेलिब्रिशन पॉईन्ट तयार करण्यात आला आहे. लोखंडी पत्र्यापासून कुत्र्यांच्या आकर्षक कलाकृती करून लावण्यात आल्या आहेत.
दिवसभर घरात बसून कुत्री चिडखोर होतात. त्यांना बाहेर मोकळ्या हवेत फिरावयास न्यावे लागते, त्यासाठी प्रायोगिक तत्वावर डॉग पार्क तयार केले आहे, आणखी सेवा व सुविधा निर्माण करण्याचा विचार आहे.
– संदीप खोत, उपायुक्त…












