न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- रस्त्यावर सांडलेल्या तेलामुळे दुचाकीस्वार घसरल्याची घटना शनिवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास नाशिक फाटा ते चिंचवड या मार्गावर घडली. या घटनेत दुचाकीस्वार घसरून जखमी झाले.रस्त्यावर पसरलेल्या तेलावर पाण्याचा मारा करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
एका वाहनामधून तेल सांडून पसरले होते. त्या तेलावरून जाताना दुचाकीस्वार घसरून पडले. त्यामध्ये काहीना दुखापत झाली आहे. तत्काळ रस्त्यावरती पडलेल्या तेलावर पाणी मारून रस्ता साफ करण्यात आला.