न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२४) :- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने संभाजीनगर येथे इ. १० व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिकुल परिस्थितीतून मोठ्या मेहनतीने प्राविन्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा या अनुषंगाने रूपेश मोरे व पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कामगार नेते, शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा डॉ. कैलास कदम, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, कॅप्टन श्रीपत कदम, अशोक कदम, प्रदीप सकपाळ, विजय निकम, मनोहर यादव तसेच कोकण खेड युवाशक्ती सर्व सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संदीप कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुर चव्हाण यांनी केले.