न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२४) :- विकास आराखड्यातील रस्त्याची जागा ताब्यात घेण्याकरिता महापालिकेच्या वतीने पुनावळे आणि व चिखलीत सोमवार आणि मंगळवारी रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी व किवळे येथील मंजुर विकास योजनेमधील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूस १२ मी. सेवा रस्ता, चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२मी/१८ मी रुंद डी.पी. रस्ता, ३) चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२मी, २४मी व ३० मी रुंद रस्ता, ४) चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी.पी. रस्ता, ५) चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता, तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रुंद उर्वरित रस्ता, तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता, तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.०० मी रस्ता व चिखली तळबडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता यासाठी भूसंपादन करण्यात आले. यावेळी जमीन मालक, विकसक जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते.
नगररचना विभागाने तयार केलेल्या नकाशा पाहून आपली जागा रस्त्याच्या संपादनात येत असल्याची खात्री झाल्यानंतर कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करून जागेचा आगाऊ ताबा अनेकांनी दिला. महानगरपालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे “अ” व “ब” प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले. दोन्ही ठिकाणी जागेचे मालकांनी उर्वरित क्षेत्रही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे. या शिबीरामध्ये काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्यामुळे “अ” व “ब” प्रपत्र न मिळाल्यास संबंधित जमिनमालकांनी महानगरपालिकेतील नगररचना व विकास विभाग येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधल्यास “अ” व “ब” प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या दोन शिबिराचे आयोजन आयुक्त. शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. त्यामध्ये उपसंचालक, नगररचना प्रसाद गायकवाड, सहाय्यक संचालक, नगररचना संदेश खडतरे, कार्यकारी अभियंता विजय वायकर, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, उपअभियंता उमेश मोने, सुभाष काळे, अशोक कुटे, सुनिल पवार, कनिष्ठ अभियंता अक्षय कुंभार, वृशाली पाटील, संजय बंडगर, राजदीप तायडे, अनिल इवे, रुपेश भूराणे, अमोल पाचागणे, गिरीश गुठे, रुकुपचंद देशमाने, सञ्चितानंद महाजन, रिनल तिडके, अमृता जच्हेरी, नेहरकर, अनुप भोसणे, इमरान कलाल, अमित शिंदे, दिनेश, सर्व्हेअर नितीन जवळकर, मुकुंद क्षीरसागर, परशुराम बनपट्टे, धनश्याम गवळी, संतोष कदम, हनुमंत टिळेकर, अबीद पटेल आदी उपस्थित होते.

















