न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२४) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने पंढरीनगरीत जमतात. तसेच महाराष्ट्रातील गावोगावी देखील विविध मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने भाविक गर्दी करत असतात.
दरम्यान आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच आणि वै. हभप वामन महाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव या सेवा संस्थांच्या वतीने कुदळवाडीतील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त खिचडी व फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन मा. स्वी. नगरसदस्य दिनेश लालचंद यादव यांनी केले होते. अनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.














