- आ. अमित गोरखे यांनी मानले महायुती सरकारचे आभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२४) :- मातंग समाजाची गेली कित्येक दिवसांच्या मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे. बार्टीच्या धर्तीवर आर्टिची स्थापना करून मातंग समजातील उपेक्षित घटकांना एक नवी संजीवनी देण्याचे कार्य सरकारने केले. यापुढे मातंग समाजातील युवक, युवती भविष्यात IAS, कलेक्टर, झालेले नक्की दिसतील, असे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
तसेच या महायुती सरकारचे आभार मानले. संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहील, अशी या निमित्ताने त्यांनी ग्वाही दिली आहे.
शिक्षणा पासून वंचित होत चाललेला समाज आर्टिच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुशिक्षित होईल. आर्टि ची स्थापना हा मातंग समाजातील एक महत्त्वाचा विषय असल्याने महायुती सरकारने या मुद्याला लवकर न्याय दिला. त्या बद्दल मातंग सममाजातून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.














