- मैदानी चाचणीमध्ये इतके उमेदवार झाले फेल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २६२ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती सुरु आहे. भरतीची लेखी परीक्षा १० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ताथवडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २६२ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९ पदे, महिला ७८ पदे, खेळाडू १५ पदे, प्रकल्पग्रस्त १४ पदे, भूकंपग्रस्त ४ पदे, माजी सैनिक ४१ पदे, अंशकालीन पदवीधर ११ पदे, पोलीस पाल्य ७ दोन हजार ९८९ उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र पदे, गृहरक्षक दल १३ पदे, अनाथ ३ पदे राखीव आहेत.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांसह कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
पिंपरी-चिंचवड पोलीस २६२ जागांसाठी दलातील राज्यभरातून १५ हजार ४२ अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मात्र मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी अवघे दोन हजार ९८९ उमेदवार पात्र ठरले. उर्वरित १२ हजार ५३ उमेदवार मैदानी चाचणी मधूनच बाहेर पडले.












