न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२४) :- राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू आनंद ऋषीजी म सा यांच्या १२४ व्या जन्म जयंतीदिनानिमित्त दिनांक ३० जुलै पासून ५ ऑगस्ट पर्यंत कासारवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सामाईकचे महत्व, दानाचे महत्व, दादा दादी रक्षा कवच, गुरु आनंद यांची महिमा ,तपश्चर्येचे महत्त्व, गुरु आनंद मानवतेचे मसिहा अशा अनेक विषयावर साध्वीजींची व्याख्याने झाली तसेच सामायिक दिवस, एकासना दिवस, आयंबिल दिवस, मौन दिवस, अशा विविध प्रकारच्या तपश्र्चर्येने हा सप्ताह संपन्ना झाला. यामध्ये ८० भाविकांनी एकासना, ५५ भाविकांनी आयंबिल चे तप केले.
साध्वी उपप्रवर्तिनी पू मंगल प्रभाजी या गुरु आनंद विषयावर बोलताना म्हणाल्या की, ”आचार्य आनंदॠषिजी हे कलियुगातील फार मोठे संत होते. त्यांच्या साधनेमध्ये फार मोठा प्रभाव होता. त्यांनी श्रमण संघाची एकता आणि अखंडता यासाठी जीवनभर प्रयत्न केले. आपल्या भक्तांवर त्यांनी अतोनात प्रेम केले. त्यांच्या महानिर्वाणानंतर देशभरातील लाखो भाविक दुःख सागरात बुडाले आणि त्यांचा परमेश्वर त्यांना सोडून गेल्याची अतिशय दुःखद भावना त्यांच्या मनात होती. त्यांच्या भक्तांनी आचार्य आनंद ऋषीजी यांच्या नावाने अनेक विद्यालये, हॉस्पिटल्स, प्राथमिक शाळा, समाज उपयोगी उपक्रम सुरू केले. समाजसेवेचे फार मोठे काम या संस्थांच्या माध्यमातून होत आहे.
प पू डॉ मधुस्मिताजी म सा, प पू हर्षिताजी आणि प पू दिव्यांशी श्रीजी यांनी भावगीताच्या माध्यमातून आपले भाव प्रगट केले. यावेळी डॉ. अशोककुमार पगारिया, दिलीप भन्साळी, सुरेश धाडीवाल, विलास कुमार पगारिया, नितल फुलफगर, अशोक चोरडिया, लता पगारिया, प्रियांका कांकरिया अशा अनेक भाविकांनी तसेच आनंदॠषिजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, आचार्यांबद्दलच्या आपल्या भावना आपल्या भाषणातून आणि भावगीतामधून प्रकट केल्या.
सूत्रसंचालन प्रा डॉ अशोककुमार पगारिया यांनी केली. आनंद सप्ताहाच्या आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, महामंत्री पंकज कांकरिया, मा. अध्यक्ष संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष संदीप कर्नावट आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या वेळी गीता जैन, सुनील कोठारी, निकीता श्रीश्रीमाळ, विपुल पगारिया, राहुल पगारिया, धनेश बोरा या तपस्वींचा सत्कार श्री संघाच्या वतीने आणि तपस्येच्या बोलींने करण्यात आला.














