न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२४) :- शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख संभाजीराव शिरसाट यांची शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा ” शहरप्रमुख ” पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव किरण पावसकर, संजय माशेलकर यांच्या हस्ते शिरसाठ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, पुणे महिला संपर्कप्रमुख गीतांजली डोने, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.














