- माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचे युवकांना आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- माजी नगरसेवक व युवा सेना जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी इतरांनी आप-आपले वाढदिवस वाढदिवस साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले होते. त्याची दखल घेत विशाल जाधव याने अनावश्यक गोष्टीला फाटा देत, आपला वाढदिवस गोरगरीब रुग्णांना, गरजूंना मदत करीत, साजरा करण्याचे ठरवले आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयात फळे व लहान मुलांना खाऊ वाटप करून सामाजिक भान जपण्याच काम केलं.
ननावरे मत व्यक्त करताना म्हणाले की, सध्या सगळीकडेच चौका-चौकात तरुण मुलं आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसतात. यामध्ये ५०० रुपयांचा केक आणून, तो मित्रमंडळी कापतात. पण, केक कापल्यावर फक्त फोटो काढण्यापुरता केक चारताना दाखवला जातो आणि त्यानंतर तो अक्षरशः सर्वजण ज्याचा वाढदिवस आहे, त्याच्या तोंडाला सगळा केक फासतात.
यामध्ये एकच गोष्ट होते ती आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी. सार्वजनिक जीवनात आपण पहात आहोत, अनेक लोकांना एक वेळचं अन्न देखील भेटत नाही. अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. माझ संपूर्ण तरुणाईला आवाहन आहे, आपणच उद्याचे भविष्य आहात. सामजिक भान जपणे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अनाथ आश्रम, व्रुद्धआश्रम, रुग्णालये, शेतकरी, गोशाळा, अंध-दिव्यांग अशा सर्व गरजूंना मदत करा. जेणेकरून आपण सामाजिक भान जपण्याचं महान कार्य कराल.











