न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. तर, तरुणी बेपत्ता आहे. ही घटना मावळातील इंदोरी कुंडमळा येथे गुरुवारी (५ सप्टेंबर) रोजी घडली.
रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे (वय २२, रा. चिंचवडगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, श्रेया सुरेश गावडे (वय १७, रा. चिंचवडगाव) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहनचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. तर, सायंकाळी उशिरापर्यंत श्रेयाचा शोध सुरू होता. सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.











