न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागातर्फे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अर्बन अफेयर्स आणि इकले साऊथ एशिया यांच्या माध्यमातून पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व राज्यातील नगरपालिकेच्या अधिका-यांसाठी आयोजित कार्यशाळेचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी तीन दिवसीय कार्यशाळेस संबोधित करताना महापौर राहुल जाधव म्हणाले की, शहरांची लोकसंख्या दुपटीने वाढली असून शहर स्वच्छतेसाठी प्रशासनास प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून राज्यातील शहरे व उपनगर तसेच ओद्योगिकनगरी स्वछ ठेवण्याकरिता पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर राहुल जाधव यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यशाळेस नगरसेवक सागर गवळी, सहायक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर, शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अॅलिस पोरे, नॅशनल इन्सिट्युट ऑफ अर्बन अफेयर्सच्या उमरा अनिस, इकले साऊथ-एशियाच्या बेदो श्रुती सादुखान, निखिल कुलकर्णी, रितु ठाकुर आदी उपस्थित होते.