न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२४) :- पीएमआरडीएतील नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. पीएमआरडीएमध्ये अनेक अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. बदली होऊन देखील पुन्हा ते याच कार्यालयात नव्याने रुजू होत आहेत. वरिष्ठ पातळीवरील हितसंबंधांमुळे या अधिकाऱ्यांना खुर्ची सोडवत नसल्याची स्थिती होती.
नुकतीच नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नगररचनाकार भाग्यश्री ढवळसंग, गणेश चिल्लाळ यांची सहायक नगररचनाकारपदी नियुक्ती झाली आहे.
या विभागात नव्याने तीन नगररचनाकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहायक संचालक म्हणून श्वेता पवार यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.















