न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील ‘पंतप्रधान आवास योजना’ या प्रकल्पाचा डीपीआर संबंधित अधिकाऱ्याने चुकीच्या पध्दतीने तयार करून संबधीत प्रकल्पात प्रत्यक्ष हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी स्मरणपत्राद्वारे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार चाबुकस्वार यांच्या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागास चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास पिंपरीतील आंबेडकर चौक येथे उपोषणास बसू, असे चाबुकस्वार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.










