न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी प्रतिनिधी :- पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत हिंजवडी परिसरातील भूमकर चौक येथील वाहतूक सुरुळीत करण्याकरिता हरकती व सूचना पाठ्वियाचे आवाहन करण्यात आले होते
या बद्दलची मुदत संपल्यानंतर नागरिकांचे वाहतूक बदलांबाबतचे विचार स्वीकारत वाहतूक विभागाने पुढील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल दिनांक २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरु ठेवण्यात येणार आहेत.
पुढील महिन्यातील २६ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात जमा कराव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
भूमकर चौकातील वाहतुकीत करण्यात आलेले पुढील बदल :-
- हिंजवडी गावामार्गे येणा-या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई. सरळ जाऊन काळा खडक येथून यु टर्न घेऊन जाण्यास परवानगी.
- डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई. वाहन चालकांनी सरळ जाऊन मारुंजी वाय जंक्शन येथून यु टर्न घ्यावा.
- शनी मंदिर ते भूमकर चौक हा दुहेरी मार्ग करण्यात आला आहे.
- सयाजी हॉटेल ते भूमकर चौक हा दुहेरी मार्ग करण्यात आला आहे.
- मायकार शोरूमपासून भूमकर चौकात येणा-या वाहनांना उजवीकडे वळण्यास व सरळ जाण्यास प्रवेश बंदी.
- डावीकडे वळून मारुंजी वाय जंक्शनपासून यु टर्न घ्यावा.