न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर एक वर्ष (साल २०१८ -१९) करिता पिं. चिं. मनपाच्या वतीने भाजपच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सर्वसाधारणसभेत शर्मिला बाबर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात विद्यापीठ क्षेत्रातील नगरपालिका किंवा महापालिका सदस्यांपैकी एका सदस्याचे विद्यापीठ अधिसभेवर नामनिर्देशन करण्याची तरतूद आहे.