न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगीकीकरणामुळे व नोकरी-धंद्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक कामगार स्थायिक झाले. प्रचंड लोकसंखेमुळे शहरातील जागा नागरिकांना अपुरी पडू लागली.
त्यामुळे काही अविचारी व्यक्तींनी अनधिकृतपणे जागा उपलब्ध करून देण्याच्या धंदेवाईक कृतीमुळे नैसर्गिक ओढे, नाले बुजवून त्या ठिकाणी अनधिकृतपणे प्लॉटिंग चा व्यवसाय थाटला अशा कृतीमुळेच नंतर अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
असाच काहीसा प्रकार आज चिखली परिसरातील कुदळवाडी पवारवस्ती शेजारील उड्डाणपूलाजवळ घडला. या परिसरातील काही भंगार व्यावसायिक मिळून नैसर्गिक जुना नाला बुजविण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा नाला बुजवण्याचा प्रयत्न या परिसरातील दक्ष नागरिक चद्रकांत जाधव यांच्या लक्षात आला व वेळीच ही माहिती यांनी स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या कानी घातली.
दिनेश यादव यांनी तात्काळ पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी पोपट घावटे यांची भेट घेऊन पुढील कार्यवाहीकरिता पाऊल उचलले व घटनास्थळी पोहचून पाहणी केली व नाला बुजविण्याचे काम तात्काळ थांबवले व संबंधिताना या घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले.
दिनेश यादव यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे नाला समस्या मार्गी लागली अन्यथा या परिसरात सांडपाण्याच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असते. यावेळी या परिसरातील नागरिकांनी दिनेश यादव यांचे आभार मानले.