- तक्रार निवारण दिनामध्ये आजपर्यंत १२,८४३ तक्रारींचा निपटारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी (दि. २२) रोजी सकाळी १०/३० वा. ते दुपारी ०२/०० वा च्या दरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदारांनी सबंधीत पोलीस स्टेशन येथे समक्ष उपस्थितीत रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरीकांच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होण्यासाठी विविध माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात. यामध्ये वेब पोर्टल, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच प्रत्यक्षरीत्या पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस उप आयुक्त कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल, केंद्र शासनाचे पी.जी.पोर्टल तसेच शासन व वरिष्ठ कार्यालयाकडुन वेगवेगळया प्रकारचे तक्रारी अर्ज प्राप्त होत असतात. या प्राप्त तक्रारी अर्जाचे संदर्भात मुदतीत उचित कार्यवाही करुन अर्जाची निर्गती करणे अपेक्षित आहे. नागरीकांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरीकांची गैरसोय होत असते.
त्याअनुषंगाने नागरीकांशी थेट संवाद साधता यावा व तक्रारदार यांची गैरसोय न होता त्यांच्या तक्रारीची वेळेत निरसन व्हावे याकरीता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रत्येक महिन्याच्या दर पोलीस उप-आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे. दरम्यान १८/०५/२०२४ ते १५/०२/२०२५ रोजी पर्यंतच्या तक्रार निवारण दिनामध्ये १२,८४३ तक्रारी अर्जाची निर्गती करण्यात आलेली आहे.














