- महापालिका आयुक्तांच्या नावानेही पाठवलेत मेसेज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी असल्याचे भासवत थकित पाण्याचे बिल न भरल्यामुळे पाणी कनेक्शन कट करण्याची वृद्धाला भीती घातली.
थकित बिल भरण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठवून ती त्यांना डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्याद्वारे फिर्यादीच्या खात्यावरून आरोपी यांनी दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच आयुक्तांच्या नावाने देखील अशाच प्रकारचे वेगवेगळे मेसेज पाठवले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे
हा प्रकार (दि. १६) निगडीतील यमुनानगर येथे घडलेला आहे. याप्रकरणी रतनलाल शर्मा (वय ७६ वर्ष, ट्रान्सपोर्ट व्यवसायिक) यांनी दिनेश जोशी यासह वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक धारकांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.















1 Comments
🔓 You have a transaction from unknown user. Gо tо withdrаwаl =>> https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=04bff1e8c449f3c730da48bca63b8245& 🔓
9q3kg9