न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- शिवजयंती साजरी करण्यासाठी मित्रांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या वीस वर्षीय तरुणाचा टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेला आहे. या अपघातात त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला, त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे.
या अपघातास आरोपी टेम्पोचालक कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अपघातानंतर आरोपी टेम्पो चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला आहे. हा प्रकार बुधवारी वाकड हिंजवडी ब्रिज जवळील रस्त्यावर घडलेला आहे.
याप्रकरणी अभिमन्यू पिसे यांनी आरोपी वाहन चालक इम्रान पटेल आणि आरफात शेख या दोघांच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे. वाकड पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.


















