- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
सायंकाळी ५ वाजता सहकारी आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पवनाथडी जत्रेचे उद्घाटन होणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अरूण लाड, उमा खापरे, जयंत आसगावकर, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, महेश लांडगे, राहुल कुल, अण्णा बनसोडे, बापूसाहेब पठारे, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासणे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.














