- हॉटेलमधील कामगारांना देखील मारहाण; दोघेजण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- बिलावरून वाद घालत “आम्ही नाणेकरवाडीचे भाई आहोत, तुला दाखवतो” अशी धमकी देत लाकडी दांडके आणि राॅडच्या सहाय्याने हॉटेलची तोडफोड केली.
हॉटेलमधील कामगारांना देखील मारहाण करून गंभीर दुकानात दुखापत केले आहे. हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे देखील चोरून आले आहेत. हा प्रकार रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल पाटलांचा ढाबा, रासे खेड तालुका येथे घडली आहे.
याप्रकरणी हॉटेल चालक शुभम मुंगसे यांनी आरोपी डॅनी जाधव आणि त्याच्याबरोबरचे इतर सहा जण यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन आरोपी निष्पन्न केले आहेत. वैभव घागरमाळे आणि सुरज घुमरे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतरांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक न्यामणे हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.














