- तब्बल अठरा पालकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२५) :- आरटीई प्रवेशासाठी बनावट रहिवासी दाखल्यांच्या आधारे राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25% कोट्यातून आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवून देत शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी तब्बल 18 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान माताळवाडी, भुगाव, पुणे येथे घडला आहे.
या प्रकरणी एका महिलेने तब्बल 18 पालकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. बावधन पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव या करीत आहेत.














