न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ मे २०१९) :- भारतामधील पहिल्या QUTE QUADRICYCLE गाडीचा वितरण समारंभ पुणे येथे व्होरा ऑटो या शोरूममध्ये पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, व्होरा ऑटोचे संचालक तारमिंदर सिंग व्होरा व मालक दशमितसिंग व्होरा यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी बजाज ऑटोचे रिजनल मॅनेजर नितेश भांठिया व विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
नितेश भांठिया म्हणाले की, बजाज QUTE ही कार नसून इंटरसिटी गाडी आहे. हीचा उपयोग शहरातल्या शहरात फिरण्यासाठी तसेच वाढते प्रदूषण व वाढती ट्राफिक यापासून सुटका मिळण्यासाठी आहे. ही गाडी पेट्रोल व CNG या दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. या गाडीचे वजन ४५२ कि. असून DTSI इंजिन आहे. CNG मायलेज ४३ कि. मी. प्रति कि. व पेट्रोल मायलेज ३८ कि.मी. प्रति ली. याप्रमाणे आहे. ही गाडी लाल, पिवळी, निळी, पांढरी, हिरवी या रंगामध्ये उपलब्ध आहे. व्होरा ऑटो यांना प्रगती प्रोसेस तर्फे पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे.
QUTE ही गाडी खालील शोरूममध्ये उपलब्ध आहे :-
बिबवेवाडी : ७३२/बी.पुणे सातारा रोड, हॉटेल लोकेशच्या समोर पुणे ३७. फोन : ०२०२४२२१५०५
हडपसर : स. न. २८१/१/३ फिश फार्म समोर ,सोलापूर रोड, पुणे २८ . फोन : ७४९८८१५३७९
कर्वेनगर : शॉप न.३ यशश्री अपार्टमेंट, कर्वेनगर, पुणे ५२ फोन :९५१८५५९८३०
वाकड : शॉप न. १२५/१/३ हिंजवडी रोड, काळा खडक, पुणे 57 फोन : ७०२०७३३२७७















