न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- मुळशी तालुक्यातील मारुंजी ग्रामपंचायतीच्या उप-सरपंचपदी संदीप विष्णू जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच बायडाबाई हिरामण बुचडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोमा खैरे व ग्राम विकास अधिकारी यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य विकास जगताप, कृष्णा बुचडे, संगीता जाधव, गणपत जगताप, आकाश बुचडे, संजय बुचडे, राजश्री बुचडे, पूनम बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.











