न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते















