- मा. उपमहापौर डब्बू आसवानी यांचा समस्या सोडवण्यासाठी पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी येथील म्हाडा गृहनिर्माण सोसायटीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणीनंतर सोसायटीला नवीन तीन पाण्याच्या लाईनचे कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे सध्या रहिवाशांना दिलासा मिळाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे.
या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निकाला संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी सतत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मा. उपमहापौर व स्थायी समितीचे मा. सभापती हिरानंद उर्फ ‘डब्बू’ आसवानी यांनी दिली. “हा प्रश्न लवकरच पूर्णपणे निराकरण होईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी सोसायटीतील ज्येष्ठ दिले.
नागरिकांच्या विविध अडचणींचाही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. तसेच म्हाडा गृहनिर्माण संस्थेमार्फत अपुऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक “सोसायटीतील चर्चा केली. राहणीमान सुधारण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.” असे आश्वासन मा.उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी दिले. स्थानिक रहिवाशांनी पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने सोसायटीमध्ये आनंद व्यक्त करत मा.उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांचे आभार मानले.










